महिला व मुलींची सुरक्षा
लेखक - सानिका भोईटे
आधुनिक काळापासून आपण पाहत आलोय महिलांवर अन्याय व अत्याचार होत आहेत. तेव्हापासून ते आजच्या या कलयुगात महिला सहन करत आली आहे. पहिल्या काळात फक्त पुरुषांचा प्रत्येक हक्क, निर्णय घेण्याचा वर्चस्व असायचे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच असायचा तो निर्णय कितीही महत्वाचा असला तरीसुद्धा घरामध्ये महिलांना घ्यावयाचे निर्णय देखील पुरुषच घ्यायचे.
महिलेला आजच्या या काळात सुद्धा पुरुषांसारखा मान सन्मान नाही मिळत. कारण जेव्हा एखाद्या महिलेला विवाह होतो तेव्हा तो पुरुष त्या महिलेला त्याची संपत्ती मनात आहे. त्या महिलेचा अपमान, मारपीट करतात त्याचबरोबर महिलेला कोणत्याही क्षेत्रात काम करताना पुरुषापेक्षा कमीच वेतन दिले जाते तसेच प्रत्येक महिलेला तिचा निर्णय घेण्याचा हक्क हवा त्यामुळे ती समाजात कोणालाही न घाबरता समाजाचा विचार न करता तिने स्वतः चा निर्णय स्वतः घ्यायला हवा. त्यासाठी त्यासाठी तिला कोणत्याच पुरुषावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. पहिल्या काळात महिलेवर खूप अत्याचार व्हायचे पण जसजसे काळ बदलत गेला तसतसे महिलेच्या विचारात बदल होत गेला. त्यांना त्यावर होणारा अन्याय समजू लागला.
काही महिलांना त्यावर समाजात होणाऱ्या अन्याय विरुद्ध बोलायला देखील लाज वाटते.काही महिला या स्वतः चा किंवा घरच्यांचा विचार करुन गप्प बसतात मी जर ही गोष्ट घरी सांगितली तर घरचे काय म्हणतील किंवा समाज सुद्धा मलाच दोषी ठरवेल, हे सगळं पाहून ती गप्प बसते समाजातील लोक हे महिलेवर च पाहिले बोटं उठवतात पुरुषाला कोणीच काही बोलत नाही. एखाद्या महिलेवर जरी एखादी व्यक्ती सतत तिचा पाठलाग करत असेल तर ती हे सांगायला देखील घाबरते. मग तिला याचा खूप मानसिक त्रास होतो तरीसुद्धा या समाजात महिला सुरक्षित नाही.
महिलेची प्रगती आणि सुरक्षितता या समाजात खुप महत्वाची आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात महिला सर्वे किंवा अनेक वेगवेगळे सर्वे घेतले जातात ते अधिकाधिक महिलांपर्यंत पोहाचीवने गरजेचे आहे म्हणून प्रत्येक महिलेला समाजापासून न घाबरता झांसी की राणी नाहीतर एक योद्धा जो एक स्त्री असून पण इंग्रजाच्या गुलामातून तिने आवाज उठवला.
महिला ही या युगात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असेल किंवा काय महिला पुरुषांच्या पुढे जात असतील प्रत्येक कामात तर हे काही लोकांना बघवत नाही. म्हणून ते लोक त्या महिलेला भीतीदायक काही हल्ले किंवा भीती दाखवतात. त्यासाठी त्या महिलेला direct action घेऊन योग्य तो निर्णय घेतला पाहिजे किंवा पोलिस कंप्लेंट करावी.
मुलींची सुरक्षा
मुलींची सुरक्षा हा विषय आपल्यासाठी आणि देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आपल्या देशातील मुली सुरक्षित नाहीत आपला देश प्रत्येक गोष्टीत प्रगती करीत असेल तरीसुद्धा मुलींची सुरक्षा व महिलांची यात खूप मागासलेला आहे. आपल्या देशात मुलींना लक्ष्मी समजले जाते तरी सुद्धा मुली या सुरक्षित का नाहीत?
याचा देखील विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
आजच्या युगात मुलीने प्रत्येक क्षेत्रात जाऊन त्यासाठी प्रयत्न करुन ते कर्तव्य जगभर पसरवले आहे तरीसुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनवण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने मुलींना पाहिजे तेवढा योग्य मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलींचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक मुलगी ही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्वत्रंत असली पाहिजे.
जेव्हा एखादी मुलगी कुठल्याही कारणामुळे घराबाहेर पडते, तेव्हा तिचा योग्य तो मान केला पाहिजे. आत्याच्या मुली या शिक्षणासाठी, कामासाठी आणि नोकरीसाठी बाहेर पडतात. त्यांच्या संरक्षणासाठी व अत्याचार किंवा छळ होता कामा नये, म्हणून एक सुव्यवस्था केली पाहिजे. मुलींच्या याच सुरक्षिततेत आता डिजिटल साक्षरता हा नवीन सर्वे केला आहे डिजिटल साक्षरता म्हणजे काय? आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रोनिक वस्तू वापरतो आहे. जसे की मोबाईल, संगणक, लॅपटॉप ते सगळे निर्माण करू शकलेलो आहे. याच वस्तूचा संपूर्ण वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल सुरक्षा होय.
याच डिजिटल संसाधनांमुळे मुली या असुरक्षित आहेत. मुली या शिक्षणासाठी घराबाहेर पडतात किंवा नोकरीसाठी त्यामुळे प्रत्येक मुलीकडे मोबाईल हा असतोच, पण या मोबाईल मध्ये देखील व्हॉट्सॲप, इंस्टा, फेसबुक, टेलिग्राम इ. ॲप मुलींसाठी मोबाईल वापरणे देखील धोक्याचे आहे एखाद्या मुलीने इन्स्टा तिला रीलस बघण्यासाठी जरी ओपन केला तरी तिची ओळख ही इंस्टाच्या अनेक व्यक्तीसोबत होते ती त्या व्यक्तीच्या संपर्कात राहते.
तिची जर ओळख जर ऑनलाईन जरी झाली तरी तिची पुढे ओळख होऊन ते दोघे रेलेशन मध्ये येतात. एकतर तो मुलगा कुठला, काय करतो, हे माहिती नसताना देखील तो मुलगा तिला मेसेज करुन बोलायला भाग पाडतो. आणि आजच्या काळात मुलींची खूप फसवणूक होते तो मुलगा भेटल्यानंतर तिला वाटते तो छान दिसत असेल पण तो एक माणूस असतो आणि तिला भेटायला आलेला असतो. म्हणजेच आताच्या काळात मुली सुरक्षित नाहीत.
मुलींनी मोबाईल वापरणे हे देखील त्यांच्या साठी खूप धोक्याचे ठरते. काही मुली हे घडलेली गोष्ट घरी सांगायला देखील घाबरतात त्यांना जर कोणी ऑनलाईन त्रास देत असतील किंवा कोणी पाठलाग करीत असेल तरी, मी हे घरी सांगितलं तर, घरचे माझ कॉलेज किंवा नोकरी ला बाहेर जायचं बंद करतील या भीतीने मुली गप्प बसतात व तो त्रास तसाच सहन करत असतात.
त्यासाठी मुलींना न घाबरता त्या प्रसंगाला किंवा कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे. आणि या समाजात मनमोकळे पणाने बोलले पाहिजे. तेव्हाच त्या कुठे तरी सुरक्षित होतील.